Monday, July 5, 2010

This is not my poem, but read it on internet. Written by Sachin

अनकाळीचा पाऊस

आज अचानक अनकाळी हा पाऊस कशाने आला
वसंतात भिजलेल्या तिचिया केसांचा गंध आठवूनी गेला
गर्द मेघ हे असमंतातुनी गडाडूनी बरसुनी जाती
पेटवती मग अंतरी तिचा आठवणींचा वाती

अनकाळीचा पावसात ह्या भिजणे योग्य नाही
जवळी असता ती तिचिया आठवणीत रुजणे योग्य नाही
मन वेडे हा पाऊस कसाही गोड ह्याला वाटे
आठवण हि तशी हताळे सांजा अन पहाटे

अनकाळीचा पाऊस हा टिकला नाही काही
आठवणीचा दीप मात्र हा नितांत तेवता राही
सांगा दोस्तहो पावसात हे मन का वेडे रुजते
पावसाचा नवा खाली हे आठवणीत का हो भिजते

-सचिन

1 comment:

  1. a gud one.....a bit difficult to understand but.. as far as i understood its gud...

    ReplyDelete